इचलकरंजी संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 2300 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर –संजय गांधी समिती अध्यक्ष अँड अनिल डाळ्या यांची माहिती 


पुणे न्यूज एक्सप्रेस :

उमाकांत दाभोळे :

इचलकरंजी संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 2300 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर –संजय गांधी समिती अध्यक्ष अँड अनिल डाळ्या यांची माहिती

 

इचलकरंजी संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी समितीचे अध्यक्ष एडवोकेट अनिल डाळ्या यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी कार्यालय इचलकरंजी येथे पार पडली .यावेळी समिती पुढे संजय गांधी सर्वसाधारण निराधार योजनेची 460 अर्ज व व श्रावण बाळ योजनेची 1820 अर्ज व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा अपंग निवृत्तीवेतन योजनेची 115 अर्ज असे एकूण 2395 अर्ज समिती पुढे ठेवण्यात आले .या अर्जापैकी जवळजवळ 2300 अर्जांना मंजुरी देण्यात आली व उर्वरित प्रकरणातील त्रुटी पूर्ण करून ती प्रकरणी पुढील मीटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले.

Advertisement

महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीमुळे आचारसंहिता लागणार आहे हे ध्यानात ठेवून समिती अध्यक्ष अनिल डाळ्या व त्यांच्या समितीने आचारसंहितेच्या दोन चार दिवस अगोदरच ही मीटिंग घेण्यात आली .या मीटिंगसाठी संजय गांधी समिती सचिव व इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार श्री सुनील शेरखाने साहेब तसेच संजय गांधी चे प्रभारी नायब तहसीलदार सौ सुरेखा पोळ मॅडम तसेच संजय गांधी समितीचे सदस्य सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, संजय नागोरे ,तमन्ना कोटगी, जयप्रकाश भगत, सलीम मुजावर ,सौ सरिता आवळे हे सर्व सदस्य उपस्थित होते.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page