आगामी निवडणुकीत हुकुमशहांचा मनसुबा उधळून लावा – फिरोज मुल्ला सर
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना प्रथम वर्धापन दिन व महामाता रमाई आंबेडकर जयंती साजरी .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माणगांवचे सरपंच राजू मगदूम यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी : आगामी निवडणुकीत हुकुमशहांचा मनसुबा उधळून लावा असे आवाहन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांनी केले
इचलकरंजी समाजवादी प्रबोधनी हॉल येथे पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना प्रथम वर्धापन दिन व महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निराश्रीत भुमीहीन शेतमजुरांच्या न्याय हक्का साठी भुमी हक्क परिषद व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती ‘संस्था यांना महामाता रमाई पुरस्कार , समाज भुषण पुरस्कार ‘आदर्श सरपंच पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले , अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे होते
गेल्या दहा वर्षात देशात आणि महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा आढावा फिरोज मुल्ला सर यांनी घेतला. देशाला गुलाम बनवणारी यंत्रणा यशाकडे वाटचाल करीत असून हे षडयंत्र हाणून पाडा असे आवाहन मुल्ला सर यांनी केले. महामाता रमाई आंबेडकर जयंती महोत्सवांतर्गत हा कार्यक्रम झाला. महामाता रमाईचा पुतळा पुणे येथे उभारण्यात आला असून कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा महामाता रमाई चा पुतळा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
हा देश त्यागाच्या संस्कृतीवर उभारला आहे त्यागाशिवाय काहीही मिळत नाही, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या त्यागामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आणि हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी किमान महाराष्ट्राने तरी सजग व्हावे असे आवाहन करीत येत्या निवडणुकीत हुकुमशहांचा मनसुबा उधळून लावा असे फिरोज मुल्ला म्हणाले.
2024 मध्ये होणाऱ्या यंदाच्या निवडणुकीत हुकूमशाहीचे स्वप्न पाहणाऱ्या हुकुमशहांना भारतीय जनता विशेषतः महाराष्ट्रातील जनता घरात बसवणार आसा आत्मविश्वास स्वराज्य क्रांती सेना पॅंथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात व पर्यायाने महाराष्ट्रात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला. तो लोकशाही मार्गाने हाणून पाडा असे आव्हानात्मक काम करण्याचे आवाहन करणारा नेता संतोष आठवले आहे अशी प्रतिक्रिया श्रोत्यातून उमटली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार उमेश जामसंडेकर, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मिराताई वहर प्रदेश संघटक ज्योतीताई झरेकर पालघर जिल्हाध्यक्षा जोषना मंत्री सांगली जिल्हा अध्यक्ष सत्वशिल पाटील पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुबळे ज्येष्ट पँथर डि एस .डोणे विचारमंचावर उपस्थित होते.
यावेळी माणगांवचे सरपंच राजू मगदूम यांना आदर्श सरपंच पुरस्कारे ने सन्मानित करण्यात आले यावेळी यशोधरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगाव , सौ .शशिकला सतिश माणगांवकर सौ . संगिता अमर काबळे सौ . वैशाली प्रशांत कांबळे / सौ मिरा गणेश तडाखे कॉम्रेड मुमताज हैदर यांना महामाता रमाई पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले तर समाजभूषण पुरस्काराने अमोल कुरणे (पत्रकार )दिलीप कांबळे मा उपसपंच रांगोळी , कुमार कांबळे , डॉ सुभाष मधाळे दिनकर कांबळे (हुपरी ) जयसिंग कांबळे (यळगुड ) दिनकर कांबळे माजी सरपंच साजणी , बाळसो कांबळे इचलकांजी , नंदकुमार साठे माजी सरपंच रुई , भिमराव कांबळे तारदाळ , श्रीकांत मोरे अशोक पाटील राजेंद्र कांबळे प्रकाश स्वामी नितिन कांबळे चंदूर रमाकांत काकडे दादासो गायकवाड तिळवणी , युवराज साठे किरण माने विलास साठे कुमार जगोजे विजय बलवान सचिन हुपरे महाविर कमलाकर मच्छिंद्र कांबळे जयसिंग तराळ कुमार कांबळे पोपट कांबळे नितिष तराळ पी डी धनवडे निमशिरगांव बाबासाहेब दिक्षांत नवे दानवाड , डॉ . ओंकार निगनुरे , धोंडीलाल चाऊस ,घोसरवाड लक्ष्मीकांत कुंबळे पुणे तौफिक किल्लेदार इचलकरंती आदिना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सर्वांनी पठण केले. स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र कांबळे यांनी करताना संघटनेच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. चंदुर ता हातकणंगले येथील नितीन कांबळे यांनी जीवाला जीवाचे दान दिले भिमाने हे गीत सादर केले. आभार डॉ . विशाल कांबळे यांनी मानले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636