आम आदमीच्या ‘बसमित्र’ संकल्पनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद


बसच्या नियोजनासाठी आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे उतरले रस्त्यावर

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेऊन नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा या हेतूने बस मित्र ही संकल्पना राबवण्यास पुणे शहरात सुरुवात केली आहे. या संकल्पनेनुसार शहरातील जे नागरिक नियमितपणे बस सेवा वापरतात त्यांनाही या बस मित्र संकल्पनेत सहभागी होण्याची विनंती केली जात आहे. बस मित्र ही संकल्पना मुख्य करून बस योग्य स्थितीत आहे का? बस मध्ये फर्स्ट एड किट तसेच फायर इक्विपमेंट व्यवस्थित आहेत का? बसच्या आत मध्ये सीट तसेच धरून उभे राहण्यासाठी हँडल्स नीट आहेत का? बसचे दरवाजे व्यवस्थित कार्यरत आहेत का? बसचा हॉर्न आणि गिअर लिव्हर व्यवस्थित कार्यरत आहे का यासारख्या तांत्रिक गोष्टींबरोबरच बस चालक बस व्यवस्थित बस स्टॉप समोर उभी करतो आहे का? बस मध्ये यूपीआय प्रणाली वापरून तिकीट दिले जात आहे का? अशा गोष्टींवर लक्ष दिले जात आहे. जे नागरिक नियमितपणे बस प्रवास करतात त्यांनी देखील या गोष्टी तपासल्यास आणि आम आदमी पक्ष किंवा पीएमपीएल यांना कळविल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नक्कीच सुधारली जाऊ शकते असा विश्वास या संकल्पनेचे जनक चेंथिल अय्यर यांनी दर्शविला.

Advertisement

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी बाणेर भागात स्वतः रस्त्यावर उतरून बसच्या वाहतुकीचे नियोजन केले त्यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे ही काळाची गरज असून भविष्यात जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही झाली तर खूप मोठ्या मोठ्या वाहतूक कोंडींना शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली. त्याच वेळेस बस मित्र म्हणून काम करताना उलट दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे बसमधून उतरणाऱ्या तसेच चढणाऱ्या नागरिकांना समस्या निर्माण होत असल्याचे मत जगदाळे यांनी बोलून दाखवले.

कोथरूडमध्ये राहणाऱ्या ॲड.अमोल काळे आणि अभिजीत परदेशी यांनी बसवाहक हे नागरिकांना नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-तिकीट विषयाची माहिती तसेच तिकीट उपलब्ध करून देत आहेत का याची तपासणी केली. यावेळी वाहकाकडून त्यांनी ई तिकीट काढताना येणाऱ्या समस्या ही जाणून घेतल्या. वाहकांच्या मते ई-तिकीट प्रणाली ही गर्दीच्या वेळेत फारशी नीटपणे राबवली जात नाही आहे, कारण प्रत्येक तिकीट काढायला काही मिनिटे लागतात, तसेच काही वेळेस सर्वरची समस्या असते. त्यामुळे नागरिकांचे पैसे कट होत असले तरी तिकीट मिळत नसल्याचे सांगितले आणि त्याचे परिवर्तन वादात होते. ती तिकीट प्रणाली अधिक प्रभावीपणे अमलात आणण्याकरिता ई तिकीटिंग बरोबरच पुणे मेट्रो प्रमाणे स्वाईप कार्डचा वापर सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी यावेळेस केली.

ही संकल्पना पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात राबवण्यात आली ज्यामध्ये फेबियन अण्णा सॅमसन, माधुरी गायकवाड, मिलिंद ओव्हाळ, कुणाल धनवडे, मंजुनाथ मानुरे आणि मोईन पठाण हे आपचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page