भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा परदेशी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम
Indian Council for Cultural Relations program for foreign students
मायदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदिच्छादूत व्हावे : अंजू रंजन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) च्या पुणे उप-क्षेत्रीय कार्यालयातर्फे परदेशी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ज्या परदेशी विद्यार्थ्यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे आणि आता मायदेशी परत जात आहेत,अशा १२० विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले .या कार्यक्रमाचे नाव एक्झिट-एंगेजमेंट-ईव्हनिंग ( ट्रीपल ई-३) असे होते.हा कार्यक्रम दि.४ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृह येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या उपमहासंचालक श्रीमती अंजू रंजन(आयएफएस ) या उपस्थित होत्या , तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती
भारत सरकारच्या विविध मंत्रालयातील आणि विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यात मालती दत्त, प्रसाद बच्छाव,श्री.बसवराज,डॉ. गजानन पवार,देबमाल्या बॅनर्जी यांचा समावेश होता.
जनस्वती(बांगलादेश),वली रहमानी(अफगाणिस्तान),अप्पाडू मनुप्रिया(मॉरिशस),मकारा यान(कंबोडिया),इस्माईल आब्दी (सोमालिया) या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुप्रिता लेले यांनी सूत्रसंचालन केले. राज कुमार यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. पराग काळकर म्हणाले,’ पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. विविध सांस्कृतिक उपक्रमांनी परदेशी विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळाले आहेत. या स्मृती आणि शिदोरी घेऊन या विद्यार्थ्यांनी पुढे जावे. मायदेशी प्रगती करावी.
अंजू रंजन म्हणाल्या, ‘सांस्कृतिक परिषद ४ हजार विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठात प्रवेश देते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ट्रीपल-ई -३ या कार्यक्रमातून परदेशी मायदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील कारकिर्दीविषयी मार्गदर्शन केले जाते. अॅल्युमनाय कार्ड या विद्यार्थ्यांना दिले जाते आणि वेब पोर्टल द्वारे उपक्रमांची माहिती दिली जाते. भारतातील शैक्षणिक अनुभव संपन्न करणारा आहे. त्यातून भारताचे या देशांशी संबंध दृढ होतील. मायदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदिच्छा दूत व्हावे . ‘
विविध देशांतील सुमारे १२० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636