निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, पथकाची धडाकेबाज कारवाई.
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या | पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर, अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना दहाचाकी बंद बॉडीचे वाहनासह अं. 1,02,08,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दि. 30/10/2023 रोजी श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29/10/2023 रोजी रात्रौ 09 च्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली,कर्यालयासमोर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना आज दिनांक 30/10/2023 रोजी पहाचे 05 च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे दहाचाकी बंद बॉडीचे वाहन क्र. NL-01/AG-9252 या वाहनाची तपासणी केली असता सदर दहाचाकी बंद बॉडीचे वाहनास पाठीमागीलदोन्ही बंद दरवाज्यांना बॉटल सील लावलेले दिसून आले. वाहन चालकाने त्या वाहना मध्ये मशिनरी स्क्रॅप भरलेले असल्याचे सांगितले. वाहनचालकाने दिलेल्या ट्रान्सपोर्ट बिल्टी नुसार संशय आल्याने त्याच्याजवळ अधिक विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे वाहन क्र. NL-01 / AG-9252 या वाहनाच्या मागील दरवाज्यावर लावलेले बॉटल सील तोड़न दरवाजा उघडून पाहिले असता, सदर वाहनामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे रॉयल ग्रेन्ड माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.ली एकुण 1000 कागदी पुठ्याचे बॉक्स (48000 बाटल्या) मिळून आले. सदर प्रकरणी जगदीश देवाराम बिश्नोई, रा. भाटीप, पोस्ट-पमाना, ता. रानिवाडा, जि. जालोर, राजस्थान पिन- 343040 सध्या रा. 22/5, हेमकुंज सोसायटी, मातावाडी, एलएच रोड, सुरत गुजरात – 395006 यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अंदाजे. रु.72,00,000/- किंमतीचे मद्य तसेच रु.30,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन, एक मोबाईल रु. 8000/- किंमतीचा असा एकुण अंदाजे रु.1,02,08,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई मा. श्री. वैभव वैद्य, प्रभारी. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखालीश्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, श्री. तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. दिपक यदंडे, श्री. प्रसाद माळी जवान व श्री. रणजीत शिंदे, जवान . वाहन चालक यांनी केली.
सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली, श्री. प्रदीप रास्कर हे करीत आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636