भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) सारख्या संस्थेची अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अत्यंत गरजेची —- फिरोज मुल्ला (सर )
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे- अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या संविधानीक न्याय हक्का करीता पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांच्या नेतृत्वाखाली “आक्रोश आंदोलन” घेण्यात आले याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी मा.ज्योती कदम यांना देण्यात आले या आंदोलनाला मार्गदर्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले (कोल्हापूर) यांनी केले
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मर्टी) च्या निर्णयाचा वित्त विभाग महाराष्ट्र राज्य सरकारने पुर्नविचार करावा. अल्पसंख्याक विभागाने मार्टीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता मात्र अशा संस्थेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट कारण देत अल्पसंख्याक विभागाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून मंजुरी रद्द केली. मार्टीमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असून याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.हे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा संविधानीक हक्कावर बंधन आनणारा अन्यायकारक निर्णय आहे . महाराष्ट्र राज्यात अनूसुचित जाती,ओबीसी, मराठा, समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बार्टी,सारथी, महाज्योती सारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करणे शिक्षण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, व्यवसायीक शिक्षण, व्यवसायीक भागभांडवल, कर्ज माफी सारख्या योजना राबविल्या जातात याच धर्तीवर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्यात यावी मागणी राज्य सरकारकडे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची होती
या मागणीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने नकार देवून अन्याय केला आहे आणि राज्य सरकारने त्यांची उच्चशिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू या निर्णयावरून दिसून येत आहे यामुळे भेदभाव स्पष्ट दिसत आहे कारण इतर योजनेसाठी आर्थिक तरतूद करून त्या योजना पद्धतशीर राबविल्या जातात पण अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्टीचा प्रस्ताव रद्द केला जातो हे अत्यंत र्दूदैवी आहे याचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने राज्य सरकारचा जाहीर निषेध करत आहे तरी सरकारने तातडीने फेरविचार निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राज्यभर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला
यावेळी शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीनभाई मुजावर, आजाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष भिमराव कांबळे, चाँदभाई बलबट्टी, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. मिराताई वहर, (मुबंई )सदस्या सौ.शकीलाताई मुल्ला, महिला प्रदेश कार्यध्यक्षा सौ.सिंधुताई तुळवे,महिला प्रदेश संघटीका सौ.ज्योतीताई झरेकर,(नगर) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे,पुणे शहर महिला उपाध्यक्षा सौ.विजयाताई खटाळ, आसरफ खान, आकाश डंडगुळे, इब्राहिम भाई आदी मान्यवर उपस्थित होते
या आंदोलनाचे संयोजन प्रदेश सदस्य रईसभाई खान,पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे, पुणे शहर कार्यध्यक्ष हासीमभाई खान,यांनी केले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636