कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठवडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठवडगाव येथे शनिवार, दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाने केली होते.सकाळी ठीक दहा वाजता महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.ज्यामध्ये छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ निर्मळे-चौगुले आर. एल. यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. त्यांनी योगाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. योग हा केवळ व्यायाम नाही तर तो जीवनशैली आहे जी आपल्याला संतुलित आणि निरोगी ठेवते असे त्या म्हणाल्या.
महाविद्यालयाच्या छात्राध्यापिका प्रगती चौगुले व सोनाली पाटील यांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे मार्गदर्शन केले.सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम आणि ध्यान यासारख्या योगासनांचा समावेश यामध्ये होता. सर्व सहभागींनी उत्साहाने यामध्ये भाग घेतला. विशेषतः छात्राध्यापकांनी योगाच्या विविध आसनांचा सराव करताना उत्साह दाखवला. प्राध्यापकांनीही योगाच्या महत्त्वावर भर देत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्रा. सावंत ए.पी. प्रा. सोरटे एस.के.प्रा.शिरतोडे व्ही.एल. ग्रंथपाल चौगुले एस.एस., छात्राध्यापक, छात्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक श्री. सोरटे एस.के. यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.त्यांनी सर्व सहभागी,आयोजक यांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाने सर्वांना निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश दिला.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636