कोरडेपणाच्या काळात स्वतःला तपासणे गरजेचे-कवी प्रा.डाॅ.चंद्रकांत पोतदार.
नरेंद्र विद्यापीठ पुरस्कार वितरण
पुणे न्यूज एक्सप्रेस :
दत्तवाड:प्रतिनिधी:’
सध्या सभोवताली अस्तित्वाच्या लढाईचा काळ बनला आहे.आव्हानं पेलत असताना प्रत्येक माणसाची अस्वस्थ घालमेल सुरू आहे. ही अस्वस्थताच लेखकाच्या निर्मितीचे केंद्र ठरते.हरवत निघालेली नात्यांमधली संवेदनशीलता चिंतनीय आहे. कोरडेपणाच्या काळात स्वतःलाच अनेकदा तपासता आले पाहिजे.’असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी केले.नरेंद्र विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विविध पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.प्रारंभी स्वामी विवेकानंद व स्व.डाॅ. न.ना.देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नरेंद्र विद्यापीठ संस्थेच्या कार्याला पस्तीस वर्षं पूर्ण झाल्याबद्दल अनुभव स्मरणिकेचे शानदार प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.अनुभव स्मरणिकेचे संपादक श्री.अमोल शेणई यांनी अनुभव या स्मरणिका संपादनामागील अनुभव मांडले.
यानंतर स्व.डॉ.न.ना.देशपांडे (राशिवडेकर)उत्कृष्ट काव्य पुरस्कार -चालू इसवी सनाचे चिरदाह(हनुमान व्हरगुळे,परभणी) बाईपण (योगिता राजकर,वाई)झांजरझाप (विलास माळी,गडहिंग्लज) दिवस कातर होताना (धर्मवीर पाटील,इस्लामपूर) स्व.दमयंती नरेंद्र देशपांडे (राशिवडेकर) गृहिणी गौरव पुरस्कार- प्रा.सौ.मानसी दिवेकर, कोल्हापूर ,स्व. वा. गो. कुलकर्णी (चिक्कोडीकर)उपक्रमशील शिक्षक पुरस्कार- प्रा.वसंत पाटील,कोल्हापूर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.न.वा.जोशी (खडकलाटकर) सेवा गौरव पुरस्कार -राजू मेवेकरी कोल्हापूर आणि सेवाव्रती स्व.जानकी न.जोशी (खडकलाटकर) सेवा गौरव पुरस्कार- डॉ.जिज्ञासा दुदगीकर (परांजपे),सांगली यांना प्रदान करण्यात आले.विकास कुलकर्णी कोल्हापूर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरविंद देशपांडे यांनी केले.आभार पी.एन.देशपांडे यांनी मांनले.यावेळी राजेंद्र कुलकर्णी,प्रशांत पुजारी,वीणा कुलकर्णी,मिलिंद देशपांडे,सौ.अंजली कुलकर्णी, प्रा.सौ.अर्चा देशपांडे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन मनीषा शनाई यांनी केले.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636