शिक्षणासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेणे कालाची गरज आहे- फिरोज मुल्ला (सर)
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : शिक्षण हक्क मंचाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजात शिक्षणाची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) होते त्यांनी जनसमुदायाला संबोधित करताना म्हणाले
मोमिनपुरा या परीसरा मध्ये सर्वसामान्य मुस्लिम समाज बहुसंख्येने राहत आहे या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी फार आडचणी निर्माण होत आहेत त्या आडचणी दुर करण्यासाठी उच्चशिक्षित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत क्लास घेऊन फार मोलाचे शिक्षणासाठी योगदान मतीनभाई देत आहेत .
मुस्लिम समाजातील उद्योजकांनी आणि मुस्लिम समाजानी मतीनभाईंच्या शिक्षण हक्क मंच्चा सारख्या सामाजिक संस्थेला आर्थिक पासून सर्वपरी मदत करावी जेनेकरून मुस्लिम समाज शिक्षणात पुढे जाऊन क्रांती करेल समाजात असे आवलिया तयार होणे कालाची गरज आहे असे मुस्लिम समाजाला आवाहन करत समाजाचे फिरोज मुल्ला (सर) यांनी प्रबोधन केले तसेच हालाकीच्या परीस्थिती मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले त्यांचे व आर्दश पालकांचा महापुरुषांच्या फोटोची प्रतीमा देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले .
यावेळी इंडियन मुस्लिम फ्रंडचे नेते गौसभाई शेख,सिकंदर पठाण सर,कलाम सर,आफिज शेख,आरशद सुंडके,फिरोज खान,आदी मान्यवर व मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होते चाँदभाई बलबट्टी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636