कराटे प्रशिक्षक अली सय्यद यांना मौलाना आझाद आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती 11 नोव्हेंबर 2024 रोजी मौलाना आझाद हॉल, कोरेगाव पार्क येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला .या वेळी पुणे येथील तरुण युवा कराटे प्रशिक्षक मा .अली सय्यद सर यांना वरिष्ठ पत्रकार मा. अशोक वानखडे यांचे हस्ते आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या नंतर मौलाना आझाद यांच्या चित्रावर पुष्प अर्पण करून, अभिवादन करण्यात आले , आणि मौलाना आझाद यांच्या सावने हयात (चरित्र) या विषयावर मोफत माहिती देणाऱ्या फ्लेक्स बोर्डचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले .
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संस्थापक अमानत भाई शेख , डॉ. एस. एन. पठाण ( माझी कुलगुरू) , रफिक तांबोळी (कर्नल सचिव ) यांनी केले होते
सर्वांचे आभार…
उर्दू चे ज्येष्ट पत्रकार मोहम्मद जावेद मौला यांनी केलेल्या विशेष प्रयत्ना मुळे आज मला पुरस्कार मिळाला आहे या सर्वांचे अली सय्यद सर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636