खाने आंबिवली प्रकल्पग्रस्तांचे पिल्लईं काॅलेजच्या विरोधात ठिय्या आंदोलन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
रसायनीतील पिल्लई कॅम्पसचे बांधकाम होत असताना आंबिवली तर्फे तुंगारतन गावकऱ्यांना गावातील सर्व मुलांना तसेच परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ असे शाळा प्रशासनाने सांगितले होते .परंतु कित्येक वर्ष होवूनही कोणत्याही प्रकल्पग्रस्त मुलांना शिक्षणात मोफत सामावून न घेतल्याने स्थानिकांत संतापाचे वातावरण होते.सदर मागणी पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासांबे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्फत मागील महिन्याभरापासून पाठपुरावा सुरु होता.
Advertisement
कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने पिल्लई शाळा व्यवस्थापन विरोधात शाळेच्या काही अंतरावर सोमवार दि.24 सप्टेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी,सामाजिक संघटना,मोठ्या संख्येने ग्रामस्थ व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून पाठींबा दिला.पिल्लई व्यवस्थापन जोपर्यंत परिसरातील न्याय देत नाही ,तोपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन सुरुच राहील असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी बोलताना दाखविला
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636