वारकऱ्यांसाठी कायदेविषयक जागृती शिबीर
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचा उपक्रम
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : पंढरपूर वारीच्या निमित्ताने भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या कायदेविषयक साहाय्यता केंद्राने वारीच्या काळात वारकऱ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल कायदेशीर जागृती करण्यासाठी मोहिम आयोजित केली. यावर्षी ‘माझे मृत्युपत्र, माझी जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. रोहित सुरवसे यांच्या समन्वयाने आयोजित केले गेले. अॅडव्होकेट दत्तात्रय माळी यांच्यासह अनेक विद्यार्थी या शिबिरासाठी उपस्थित होते.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
पहिले शिबीर मोशी येथे २८ जून २०२४ रोजी यशस्वीपणे पार पडले, जिथे ‘रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्रमांक २२१’ चे वारकरी उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाने दिंडीला दत्तक घेतले आणि वर्षभर त्यांना कायदेशीर साहाय्य प्रदान करण्याची हमी दिली तसेच कायदेशीर जागृती मोहिमेत त्यांच्या सहभागासाठी प्रमाणपत्र दिले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636