उमेदवारी दिली नाही तर महाविकास आघाडीने मुस्लिमांचे मते गृहीत धरू नये.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे तारीख जाहीर झाली आहे त्यासंबंधी सर्व राजकीय पक्ष व उमेदवार आपापल्या मतदारसंघात कामाला लागल्याचे दिसून येत आहे लवकरच सर्व पक्षाचे उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सर्व घटकांना व समाजाला जाती आधारित न्याय देतात मात्र मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या मनात आज ही भीती असल्याचे दिसून येते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असलेल्या एकूण 48 जागापैकी एकही खासदारकीला मुस्लिम उमेदवार दिला नाही महाविकास आघाडीत काम करणाऱ्या अनेक मुस्लिम उमेदवारांनी मागणी करून सुद्धा उमेदवारी दिली नाही तरीही महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी भरभरून महाविकास आघाडीला मतदान दिले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाने पाहिले की मुस्लिम समाजात लोकसभा निवडणुकीत प्रचंड उत्साह होता प्रत्येक मतदान केंद्रावर अगदी पहाटे सकाळपासूनच मोठी रांग दिसून येत होती. त्याचे मुख्य कारण असे होते की लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांचे सर्व पंथाचे धर्मगुरू, सामाजिक संघटनांनी चंग बांधला होता की काही करून यावेळी लोकसभेचे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेत जाण्यासाठी व त्यांना रोखण्यासाठी प्रत्येक मुस्लिमांनी भरपूर प्रयत्न केले त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आले मागच्या तुलनेत यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून आले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी व तसेच भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठांनी कबुली दिली होती की यावेळी मुस्लिमांचा मतदानाची टक्केवारी वाढल्याने महाविकास आघाडीला त्याच्या फायदा झाला आहे समस्त मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त करीत त्याबाबतचे वक्तव्य महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी समस्त मुस्लिम समाजाचे जाहीर सभेतून व प्रसारमाध्यमातून आभार व्यक्त केले.
अगदी काही दिवसानंतर विधान परिषदच्या दोन जागा रिक्त झाल्या त्या ठिकाणी पुन्हा मुस्लिमांना संधी दिली पाहिजे होती मात्र तिथेही उमेदवारी न देऊन मुस्लिम समाजावर अन्याय केले. याबाबत प्रचंड नाराजी मुस्लिमांनी व्यक्त केली होती. मुस्लिम समाजाला अशी आशा होती ती कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेली चूक सुधारण्याची प्रयत्न करतील मात्र तसे होत नसल्याचे सध्याचे तरी चित्र समोर येत आहे.
भारतीय जनता पार्टी मोदी सरकारला सत्तेत पासून दूर करण्यासाठी जरी मुस्लिम समाजाने जातीने प्रयत्न केले असले तरी असे आम्ही मानतो की मोदी सरकार व धर्मांध शक्ती फक्त या देशात मुस्लिम समाजावर अन्याय करीत आहे व इतर समाज सुरक्षित आहे असे नाही तर सर्व घटकांना मोदी सरकारकडून धोका होता देशात फक्त मुस्लिमांचीच मॉब लिंचिंग होत होती इतर सर्व समाज सुरक्षित आहे असेही नव्हते. भारतीय जनता पक्ष राज्यघटनेची पायमल्ली करून या देशात मनुस्मृतीवर आधारित हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहत होते. 15 लाख रुपयांची खोटी आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने फक्त मुस्लिमांना 15 लाख दिले नाही व इतर धर्मियांना त्यांनी असे नसून काँग्रेस पक्षाच्या काळात सुद्धा मुस्लिमावर प्रचंड अन्याय अत्याचार होताना आपण सर्वांनी पाहिले आहे इतिहासाचे पाने उलटून पाहिल्यानंतर असे दिसून येते 63 हजार पेक्षा जास्त दंगली झाली तरीही मुस्लिम समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.लोकसभा निवडणुकीत जरी मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर तो फक्त या आशेनेच केल्या की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी देऊन मुस्लिमांना न्याय देतील मात्र आजच्या रोजी तरी हे समाजाला न्याय देतील असे दिसून येत नाही.
त्याबाबत पुणे शहरातील राज्यपातळी व जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या 20 ऊन अधिक संघटना मुस्लिम धर्मगुरू शैक्षणिक क्षेत्रात उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना एकत्रित करून चिंतन बैठकीचे आयोजन केले त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण भागीदारी बैठक म्हणून पुन्हा पुणे शहरातील काही मान्यवरांच्या उपस्थितीत तो बैठक पार पाडली गेली त्या बैठकीत सर्वांच्या मताने निर्णय घेण्यात आला की पुणे जिल्ह्यात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान दोन तरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांना उमेदवारी देऊन मुस्लिमांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी
सदरच्या मीटिंगमध्ये हाही ठराव करण्यात आले होते की महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना भेटून पुण्यातील मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी याकरिता पत्र व्यवहार करण्यात आले व एक शिष्ट मंडळ पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनाही भेटून निवेदन सादर केले चाळीस वर्षांपूर्वी अमिनुद्दीन पेनवाले पेन वाले एक आमदार पुण्यातील निवडून गेले होते त्यानंतर कोणतीही संधी पुण्यात मुस्लिम समाजाला मिळाली नाही 2024 मध्ये मुस्लिम उमेदवार निवडून जाऊ शकतो जर महाविकास आघाडीने आम्हाला तिकीट दिली तर आम्ही मागणी केली की हडपसर विधानसभा मतदारसंघात 31% मतदान मुस्लिम समाजाचा असून किमान त्या ठिकाणी तरी एक मुस्लिम उमेदवार द्यावा.
विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी दिली नाही तर यावेळी महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाचे मतांना गृहीत धरू नये असे इशारा आज जाहीर आम्ही मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने देत आहोत. श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत अंजुम इनामदार , मुस्लिम राजकीय मंच, एडवोकेट आयुब शेख माजी नगरसेवक,मौलाना निजामुद्दीन मुस्लिम धर्मगुरू,कारी इद्रिस अन्सारी जमीयत ओलमा हिंद,मौलाना रझीन अश्रफ पयामे इन्सानियत, मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद डायरेक्टर मुस्लिम को-ऑपरेटिव बँक, गफ्फर सागर मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स, एडवोकेट दानिश पठाण,सादिक लुकडे मुस्लिम बँक डायरेक्टर, इब्राहिम यवतमाळ वाला सामाजिक कार्यकर्ता,समीर शेख सामाजिक कार्यकर्ता,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी व व्हिडिओ साठी संपर्क करा
9028402814

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636