इलेक्ट्रीक मोटारीची चोरी करणाऱ्या तिघां जणाना अटक करून सहा मोटारीसह 3 लाख 50 हजार किमंतीचा महिंद्रा कंपनीचा टेम्पो जप्त.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-क.वाळवे येथील शेतीच्या कामासाठी शेतकरीवर्गाने बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटारीची चोरी करणारयां अनिकेत आप्पासो शिंदे (19).शुभम सुनिल चौगुले (वय 26.दोघे रा.निगवे खा.)आणि प्रथमेश शहाजी मांडवकर (वय 23.रा.वाळवे खुर्द्द.ता.कागल) या तिघां जणाना जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन चोरलेल्या 6 इंलेक्ट्रीक मोटारीसह 3 लाख 50 हजार किमंतीचा महिंद्रा कंपनीचा टेम्पो जप्त केला आहे.पुढ़ील तपासासाठी या तिघांना राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की, क.वाळवे येथील शेतकरी मारुती शंकर शिंदे यांच्यासह इतर 5 जणांच्या शेतातील इलेक्ट्रीक मोटारी चोरट्याने लांबविल्या होत्या.या बाबतची तक्रार मारुती शिंदे यांनी 12/03/2024 रोजी राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.आज जुना राजवाडा गुन्हे शोध पथकाला चोरीतील इलेक्ट्रीक मोटारीची विक्री करण्यासाठी टेम्पोतुन कोल्हापुरच्या दिशेने तिघे जण 20/03/2024 रोजी कंळबा ,सभाजीनगर मार्गे कोल्हापुरात येत असल्याची माहिती मिळाली अ सता पोलिसांनी दोन पथके तयार करून त्या परिसरात सापळा रचला असता साडेचारच्या सुमारास हॉकी स्टेडियमच्या दिशेने एक टेम्पो येत आढ़ळला .त्यात चालकासह अन्य दोघे जण बसून येत असल्याचे दिसले.जवळ येताच पोलिसांनी सदर टेम्पो थांबवून पहाणी केली असता त्यात 6 पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी आढ़ळल्या .या बाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना या बाबत काही सांगता न आल्याने त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या मोटारी चोरीच्या असून 10 दिवसा पूर्वी क.वाळवे येथून चोरल्याची कबुली दिली अ सता सदरच्या मोटारी टेम्पोसह जप्त करून तिघांना ताब्यात घेऊन राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला हा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणुन शेतकरीवर्गाच्या मोटारी परत मिळवून दिल्या आहेत.
ही कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडेसो आणि गुन्हे शोध पथकाचे संतोष गळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636