मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या निमित्ताने मनोज जरांगे यांचा कोल्हापुर दौरा.
वाहतूक मार्गात बदल.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांचा दौरा सुरु असून ते उद्या शुक्रवार दि.09/08/2024 रोजी कोल्हापुरात येणार असल्याने कोल्हापूर पोलिसांनी वाहतुक मार्गात बदल करून पार्किंगच्या सोयीसह तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मनोज जरांगे -पाटील यांची शांतता रॅली ज्या मार्गावरुन जाणार आहे त्या मार्गावरील होणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक किरण लोंढ़े यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
मिरजकर तिकटी ,पापाची तिकटी ,माळकर तिकटी ,बिनखांबी गणेश मंदीर,महालक्ष्मी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर निघणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवून वरील मार्ग राखीव ठेवला आहे.
खालील मार्ग वाहतुकीस बंद..
मिरजकर तिकटी ते कोळेकर तिकटी,खरी कॉर्नर ते सिध्दाळा गार्डन,गांधी मैदान ते खरी कॉर्नर ,अर्धा शिवाजी पुतळा ते बिनखांबी गणेश मंदीर,गंगावेश ते पापाची तिकटी ,सीपीआर चौक ते माळकर तिकटी आणि महाराणा प्रताप चौक ते महानगरपालिका या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
तसेच दुचाकीची पार्किंग व्यवस्था नेहरु हायस्कूल,चित्रदुर्ग मठ,प्रायव्हेट हायस्कूल आणि शाहु स्टेडियम या ठिकाणी दुचाकी पार्किंगची सोय केली असून चारचाकी वाहनधारकांनी दसरा चौक ,लक्ष्मी जिमखाना,शंभर फुटी रोड ,प्रायव्हेट हायस्कूल,खराडे महाविद्यालय ,न्यु कॉलेज आणि पदमाराजे गर्ल्स हायस्कूल येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे.
ही शांतता रयली व्यवस्थित पार पडण्या साठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच महिला ,लहान मुले यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले असून त्या साठी अप्पर पोलिस अधीक्षक ,तीन पोलिस उपअधीक्षक,दहा पोलिस निरीक्षक,25 पोलिस उपनिरीक्षक,250 पोलिस कर्मचारी,50 वाहतुक पोलिस कर्मचारी आणि 100 होमगार्ड जवान असा पोलिस बंदोबस्त नेमला आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636