प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सर्जेखान यांना “मौलाना आझाद आदर्श पत्रकार पुरस्कार ” जाहीर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे -भारतरत्नं मौलाना आझाद सोशल एज्युकेशन व स्पोर्टस् असो.(महाराष्ट्र) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो.भारतरत्न मौलाना आझाद यांच्या 136 व्या जयंतीचे औचित्य साधून 2024 चा “आदर्श पत्रकार पुरस्कार”हा प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Advertisement
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.11नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडे दहा वाजता कोरेगांव पार्क ,जर्मन बेकरीच्या मागे ,पुणे.येथे मान्यंवराच्या उपस्थित होणार आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636