माई बाल विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.उज्वला कोठावळे नेशन बिल्डर ॲवार्डने सन्मानित


इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील रोटरी क्लबच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माई बाल विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.उज्वला अरुण कोठावळे यांना नेशन बिल्डर ॲवार्डने सन्मानित करण्यात आले.

येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृहात एका शानदार समारंभात या ॲवार्डचे वितरण रोटरी गव्हर्नर प्रांत शरद पै यांच्या हस्ते व उपप्रांतपाल राजेश कोडुलकर , डिस्ट्रिक्ट लिट्रसी कमिटी चेअरमन डॉ.प्रशांत कांबळे ,यतिराज भंडारी यांच्यासहविविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

Advertisement

सौ.उज्वला कोठावळे या माई बाल विद्या मंदिरमध्ये अध्यापनाचे काम करीत असून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करतानाच चांगल्या शिक्षणावर भर व विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु ठेवला आहे.यासाठी त्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापिका सौ.शैला कांबरे व सर्व शिक्षिकांचे प्रोत्साहन मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची इचलकरंजी रोटरी क्लबने नेशन बिल्डर ॲवार्डसाठी निवड केली आहे.या ॲवार्डबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page