तारदाळ येथील युवकाचा खून
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत कांबळे
खोतवाडी तालुका हातकलंगले येथील एका बार समोर मयूर दीपक कांबळे (रा.तारदाळ )या युवकाचा तिघांनी सपासप धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून सदरचा खून हा पूर्व वैमन्याशातून घडला असल्याचे प्राथमिक तपासामधून समजले जाते.
याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की मयूर कांबळे हा चार मित्रा सोबत बारला दारू पिण्यासाठी बसला होता. तिथे पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग पुन्हा उफाळून आल्याने विनायक चौगुले व त्याचे साथीदार मयूर याच्याशी वाद घालू लागले यामुळे जोरदार भांडण झाल्याने तेथून सर्वजण बाहेर पडले दरम्यान तारदाळ- खोतवाडी मार्गावर मयूरला गाठून मयूर कांबळे याच्यावर विनायक चौगुले व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला यावेळी त्याच्यावर साधारणता 22ते23 वार झाल्याने मयूर जागीच कोसळला. यानंतर हल्लेखोर पसार झाले.
सदरची घटना समजतात शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी मयूरला इचरकंजी येथील आयजीएम रुग्णालयात आणले असता. वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारापूर्वीच मृर्त झाल्याचे सांगितले. यावेळी मयुरचे नातेवाईक व मित्रमंडळीनी आयजीएम रुग्णालय परिसरात मोदी गर्दी केली होती. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली असून रात्री उशिरा दोन संशियतांना ताब्यात घेतल्याचे समजते. सदरच्या घटनेमुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636