मुस्लिम समाजाने उच्च शिक्षित झाले पाहिजे – फिरोज मुल्ला (सर)
पुणे न्यूज एक्सप्रेस
फिरोज मुल्ला सर
कोंढवा .. हक्क मंच या संघटनेच्या वतीने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी मोफत क्लास आभियानांर्तगत कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सिकंदर पठाण सर हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) हे होते ते जनतेला संबोधित करताना म्हणाले कि अल्पसंख्याक समाजाला अधिकार व हक्क देण्यासाठी सरकार गंभीर होत नसेल तर अल्पसंख्याक समाजाने लोकशाही मार्गाने जन आंदोलने करून सरकारला अधिकार व हक्क देण्यासाठी मजबूर केले पाहिजे तरच अधिकार व हक्क मिळतील समाजाने जागृत राहिले पाहिजे.
सरकार जर आपल्याला शिक्षणासाठी पुरेशी मदत करत नसेल तर शिक्षण हक मंच्चा सारख्या संघटनांना समाजाच्या माध्यमातून मदत करून आपल्या मुला मुलींचे भविष्य उजवल करण कालाची गरज आहे समाज उच्च शिक्षित झाला पाहिजे असे महत्त्वाचे मार्गदर्शन फिरोज मुल्ला(सर) यांनी केले
यावेळी चाँदभाई बलबट्टी यांनी सुत्रसंचालन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे शिक्षण हक्क मंचाच्या वतीने स्वागत सत्कार केले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636