दै.परतगंगा/दै.ग्रामदेवताचे संपादक श्री.सखाराम जाधव यांना किसान उत्सव 2025 चा निर्भिड पत्रकार पुरस्कार.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इंचलकरंजी – श्री साई फौंडेशनच्या माध्यमातून किसान उत्सव 2025 चा निर्भिड पत्रकार म्हणून दै.परतगंगा / दै.ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री.सखाराम जाधव यांना जाहीर झाला आहे.
Advertisement
या फौंडेशनच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून समाजात राजकीय ,सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.या वर्षी सखाराम जाधव यांनी आपल्या लेखनीतुन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत त्याच प्रमाणे काही प्रश्नांना वाचा फोडून संबंधित विभागाने संबंधित व्यक्तीला न्याय मिळवून दिला .अशा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न मांडून गरजूना मदतीचा हात देणारे श्री.सखाराम जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्राप्त झाला.
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि .12/01/2025 रोजी दुपारी चार वाजता सदलगा येथे मराठा भवन,बनशंकरी मंदीर येथे मान्यंवरांच्या उपस्थित होणार आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636