नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (कलाग्राम) सोसायटीस पुणे महानगरपालिकेची नोटीस
पुणे : कोथरूड, डावी भुसारी कॉलनी येथील नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्थेची(कलाग्राम सोसायटी ) इमारत ‘डी’ रहिवासास धोक्याची ठरल्याने सोसायटीस पुणे मनपाने कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, कार्यालयामार्फत नोटीस बजावली आहे.
कलाग्राम सोसायटीतील सभासदांनी पुणे मनपाचे अधिकृत स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट अच्युत नाफाडे यांच्यामार्फत ‘डी’ विंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यावर त्यांनी सदर इमारत रहिवासास धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले आहे व लवकरात लवकर पुनर्विकसन करण्याचा सल्ला दिला आहे .
तसेच डी -विंग ही इमारत धोक्याची जाहीर करण्यात आली आहे. जीवित हानीची संभाव्य शक्यता व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे मनपाने याबाबत नाट्यचित्र गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांना कायदेशीर नोटीस बजावून तातडीने खुलासा मागितला आहे . यासंदर्भात सोसायटीचे सदस्य संतोष नार्वेकर ,राकेश धोत्रे यांनी पालिकेकडे निवेदन दिले होते . ही इमारत ३० वर्षाहून जुनी असून आर सी सी बांधकाम चिरा पडून मोडकळीस आले आहे .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636