ब्रेकिंग न्यूज :करनुर येथे झालेल्या कोयता हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी .
Old man seriously injured in Koita attack in Karnur.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कागल तालुक्यातील करनूर येथे कोयता हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले यात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचे नाव गुलाब बाबालाल शेख (वय 60.रा.करनूर )असे असून कोयता त्यांच्या डोक्यात अडकेल्या स्थितीत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना सोमवार दि.08/07/2024 रोजी करनूर येथे असलेल्या स्मशानभूमी जवळ घडल्याचे समजते ते शेती व्यवसाय करत असून त्यांना पत्नी,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.या घटनेची नोंद पोलिसात अजून झालेली नाही.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636