इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात ‘स्वच्छ दिवाळी अभियान’ संपन्न
इचलकरंजी : दि.१३/११/२०२३ केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात दि.६ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर' या कालावधीत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण संपूर्ण शहरात स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी हे अभियान राबविण्यात येत आहे.
इचलकरंजी शहरात
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुख्य ठिकाणी दिवाळीचा बाजार भरतो. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फुले, ऊस तसेच केळी रोपे रस्त्यावर टाकली जात असल्याने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येतो. त्यामुळे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सुचनेनुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४.३० वाजल्यापासून सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, सर्व स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड इन्स्पेक्टर तसेच जवळपास ४०० सफाई कर्मचारी आणि आदर्श फॅसिलिटी चे प्रतिनिधी यांनी आज स्वच्छता मोहीम राबविली.
शहरातील मुख्य रस्त्यासह संपूर्ण शहरातुन आज १३० टन कचरा गोळा करणेत आला. आजच्या मोहिमेसाठी १ कॉम्पॅक्टर, ३० ट्रॅक्टर आणि घंटागाडीच्या सहायाने कचरा उठाव केला. महानगरपालिकेच्या वतीने पुढील चार दिवस याचप्रमाणे स्वच्छतेचे काम चालू राहणार आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636