समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील यांचा सत्कार व शुभेच्छा
पुणे न्यूज एक्सप्रेस :
शिरोळ ता.२७ दत्त समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विश्वस्त म्हणून सभासदांनी मोठ्या फरकाने सर्व जागा जिंकवून विश्वास कायम राखला याबद्दल समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.तसेच
अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि सर्व नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते थोर नेते कालवश आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांनी सहकारातून समाजवाद रुजवता येतो याचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्याच सर्वांगीण समतेच्या विचारधारेला आधिक व्यापक व तंत्र वैज्ञानिक साथ देत गणपतरावदादा क्षारपड जमिनीच्या विकासासह शेतीपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात गतीशिल पद्धतीने मार्गक्रमण करत करत आहेत. ही अतिशय स्पृहणीय व अभिनंदनीय बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील दत्त समुहाच्या पुढील वाटचालीस समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या भरभरून शुभेच्छा आहेत. दत्त समूह आणि समाजवादी प्रबोधिनी यांचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636