राष्ट्रीय ऑटो रिक्षा बस टैक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने इचलकरंजी येथे भव्य रिक्षा चालक मालकांचा मेळावा संपन्न झाला …
इचलकरंजी: राष्ट्रीय ऑटो रिक्षा बस टैक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने इचलकरंजी येथे भव्य रिक्षा चालक मालकांचा मेळावा संपन्न झाला …या मेळाव्यासाठी आलेले राज्यातून सर्व मान्यवर इचलकरंजी येथे प्रथम शिवतीर्थ या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून वंदन केले व सर्व प्रथम रिक्षा टॅक्सी चालकांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्र दौरा केला कोल्हापुरी इचलकरंजी येथे पोहोचतात त्यांना माहित पडलं की आपल्यातले काही समाज बांधव इचलकरंजी ते उपोषणाला बसले आहेत .
यावेळी त्यांनी कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी मराठा आंदोलकांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली व सर्व सहकाऱ्यांना घेऊन आंदोलन स्थळे गेले व मराठा आरक्षणा पाठिंबा प्रथम दिला व नंतर मोळव्यासाठी गेले या या मेळाव्यामध्ये कार्यकारिणी बैठकीमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी इचलकरंजी येथून महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना, इंदिरा ऑटो रिक्षा युनियन, टेम्पो चालक-मालक असोशियन, या सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
महाराष्ट्र मध्ये रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी व लवकरात लवकर तामिळनाडूच्या धरतीवरती महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 लाख रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन करून रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आरोग्य दृष्ट्या संरक्षण मिळावे याकरिता महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून या फेडरेशनच्या वतीने लवकरात लवकर कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे याचे पाठपुरावा करत आहे
या संघर्षासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गेली 20 वर्ष लढा देत आहेत तरी आता आर या पारची लढाई करण्याकरता जे सतत रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत आहेत अशा सर्व रिक्षा व्यवसायिकांना एकत्र करून हा लढा उभा करत आहेत या बैठकी मध्ये पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी अनिल रमेश बम्मन्नावर व महाराष्ट्र राज्य कार्यकरणी सदस्यपदी जीवन कोळी, रामचंद्र जाधव यांची
यांची निवड करण्यात आली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636