टु व्हिलर मेकॅनिक संघटनेच्या वतीने अत्यंत गरीब मुलींना दैनंदिन उपयोगी वस्तूं व मुलींच्या ड्रेस साठी दोनशे मिटर कपडा देण्यात आला
पुणे न्यूज एक्सप्रेस :
औरंगाबाद : टु व्हिलर मेकॅनिक संघटनेच्या वतीने जटवाडा येथील,”जामिया तजाकीयातुल बनात” या उर्दू इयत्ता पहिली ते सातवी च्या मुलींच्या शाळेत १५० मुली शिकतं आहे त्यापैकी ३५ अनाथ मुलीं व इतर अत्यंत गरीब कुटुंबातील मुलीं निवासी शिक्षण घेत आहे.छ.सभांजीनगर जिल्हातील मॅकेनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गॅरेज वर जाऊन. गाडी मधील जळालेले खराब काळे ऑईल जमा करून त्याची विक्री करुन त्या पैशातुन अन्नधान्य व किराणा सामान तसेच दैनंदिन उपयोगी वस्तूं तसेच मुलींच्या ड्रेस साठी दोनशे मिटर कपडा देण्यात आला.
आध्यात्मिक, सामान्य शिक्षणासोबतच टेलरीगंचे शिक्षण घेऊन स्वावलंबी जीवन जगता यावं म्हणून दोन शिलाई मशीन देण्यात आल्या संस्थेला फुल नाही फुलांची पाकळी भेट स्वरूप देण्यात आली ,या कार्यसाठी पैठण,बिडकिन, वाळुंज, फुलंब्री संघटनेचे पदाधिकाऱ्यानीं विशेष मदत केली,मुलींचे पालनपोषण करुन त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचे कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष शेख जावेद व त्यांच्या मातोश्री यांचा संघटने अध्यक्ष दादासाहेब तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद, जिल्हा समन्वय समिती चे अध्यक्ष राम पारखे,उपाध्यक्ष शेख नूर भाई, उपाध्यक्ष शेख अर्शद उपस्थित होते कार्यक्रमात शेवटी जमात चे प्रवक्ते कारी शकील साहेबांनी आध्यात्मिक प्रवचने समारोप केला ज्यांनी ज्यांनी या कार्यासाठी कष्ट घेतले त्यांच्या साठी देखील दुआ करण्यात आली समारोप नंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबाच्यां हस्ते मुलींना जेवण व गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636