उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या २१ जुलैला एक दिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा
On the occasion of Deputy Chief Minister Ajitdada Pawar’s birthday, a one-day rapid chess tournament will be held on July 21
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि विश्व विजय चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २१ जुलै रोजी एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. वाकड येथील युरो स्कूल सीबीएससी,भुमकर चौक या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अंडर ७, ९, ११, १३, १५ या विविध वयोगटासह ओपन व सीनियर सिटीझन या गटात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विश्व विजय चेस अकॅडमी चे मुख्य संयोजक मिलिंद नाईक (९९७०१८७४८१),चिन्मय नाईक (९७६२८८४९०६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विश्व विजय चेस अकॅडमी पुणे
9970187481
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636