कसबा पेठेत पुन्हा एकदा रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. कसबा पेठेतून मविआचे उमेदवार म्हणून रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना तर भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानं कसब्यात पुन्हा रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळेल.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुकांची रांग लागली होती. यात शहराध्यक्ष धीरज घाटे त्यानंतर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच धीरज घाटे यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. कारण कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे धीरज घाटे यांना उमेदवारी मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याहीवेळी हेमंत रासने यांना कसबा विधानसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे
![](https://punenewsexpress.in/wp-content/uploads/2024/08/IMG-20240825-WA01222.jpg)
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636