तारदाळ येथे मराठा समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तारदाळ येथील सकल मराठा समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शांततेत पार पडले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला असून या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तारदाळ येथील सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गौरव जाधव, विशाल पोवार, सचिन भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. यावेळी लिंगायत, मुस्लिम, बौद्ध, वडर, जैन व नाभिक,समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती (ट्रस्टचे) संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे (तारदाळकर) व सचिव विकास गायकवाड यांनी सुद्धा सकल मराठा समाज आरक्षणास पाठिंबा दर्शविला.
यावेळी उपोषणस्थळी प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, सरपंच पल्लवी पोवार, यशवंत वाणी, जयप्रकाश भगत, विनोद कोराणे, यासीन मुजावर, सचिन पोवार, चंद्रकांत तांबवे, नितीन खोचरे, रणजीत पोवार, सुर्यकांत जाधव, रमेश नर्मद, के.जी. पाटील, प्रकाश खोबरे, वसंतराव झेले, मदन चौगुले, सुरेश पोवार, रणजित माने, दत्ता मांजरे तारदाळकर, सुनिल शिंदे, प्रल्हाद माने ,दादासो सुतार, प्रवीण केरले, विमल पोवार, अमर जाधव, सलीम पट्टेकरी, प्रमोद परीट,डॉ. संदिप खोत, डॉ. नितीन चौगुले, अमर जाधव, राजाराम पाटील, जगन्नाथ भोपळे, संजय वास्कर यांचेसह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636