आदिवासी फासेपारधी समाजाच्या आंदोलनाला पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा पाठींबा
कवठेमहांकाळ : येथील आदिवासी पासे पारधी समाजातील कुंटुबांना नगरपालिका हद्दीतील गट नं 553 मधील जागा कायम स्वरूपी नावे करावीत या मागणी करीता बेमुदत राव्हटी आंदोलनास पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा जाहीर पाठिंबा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले दिला
कवठेमहांकाळ जि. सांगली येथे सन 2007 ते आज अखेर गट नंबर 553 येथील गायरान जमिनी ताब्यात घेऊन कायम स्वरूपी वास्तव करित आहेत या ठिकाणी नगरपालिकेने रस्ते विज पाणी पुरवठा व स्वच्छतागृह असे मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत तसेच कवठेमंकाळ मंडळ अधिकारी यांनी स्थानिक पंचनामा करून आदिवासी फासेपारधी कुटुंबे या ठिकाणी अतिक्रमण करून राहत असल्याचापंचनामा तहसीलदार यांना दिला आहे संबंधितमंडल अधिकारी यांच्या पंचनाम्याग्राह्य धरून अतिक्रमण असल्याचा प्रस्ताव माननीय तहसीलदाराने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे पाठवला आहे असे असताना जातीयवादी मानसिकतेतून कवठेमहांकाळ नगरपालिकेने संबंधित जागा फासेपारधी कुटुंबाला देऊ नये असा ठराव करण्यात आला आहे
या विरोधामध्ये फासेपारधी कुटुंबाने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गेली तीन महिने हे बेमुदत राहुटीमारूनआंदोलन करीत आहेत या आंदोलनास पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जाहीर पाठिंबा देत असल्याचे लेखी पत्र फासे पारधी समाजाचे कुटुंब प्रमुख मलकरी नवश्या काळे यांना देण्यात आले .
यावेळी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष हुसेन मुजावर समिर विजापुरे ,मुकेश घाटगे ,अर्जुन भिसे . मुन्ना शेख आदी उपस्थित होते या आंदोलनात माला काळे कलेपाव पवार. अर्जुन पवार . दशरत पवार ,अंकुल काळे’ बाबू काळे ,लच्डी काळे , रोहीनी काळे ,काजल काळे , अंजना काळे ,अयंदा पवार , समिर भोसले ‘ललकार पवार हे आपल्या लहान मुलाबाळा सहीत व गुरे ढोरे घेऊन गेली दिड महीना झाले उघड्यावा संसार मांडून आंदोलन करित आहेत परंतू या आंदोलना कडे शासन दुर्लक्ष करून या फासे पारधी कुंटुबाना विस्थापित करित आहे या कुंटुबांना तात्काळ संबधीत गटनंबर 553 मधील जागा नावावर करून प्रॉपर्टी कार्ड द्यावे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636