पाटील इस्टेट झोपडपट्टी वासियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा , मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन
त्वरित नुकसान भरपाईची संविधान ग्रुप ची मागणी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : नदीत पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे पाटील इस्टेट झोपड पट्टी वासियांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी या मागणीसाठी संविधान ग्रुप च्या वतीने पाटील इस्टेट रहिवाशांसह संविधान ग्रुपचे संस्थापक सचिन गजरमल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनीही निवेदन देण्यात आले.
पाटील इस्टेट मध्ये पाचशे ते सातशे घरे अजूनही पाण्याखाली आहेत .त्यांच्या जेवणाची व रेशनिंगची व्यवस्था शासनाने केलेली नाही व शाळेत जाणाऱ्या मुलांना व या पुस्तके पाण्यात भिजल्यामुळे शाळेत जाता येत नाही .शाळेपासून वंचित राहतात. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित कारवाई व मदतीची मागणी करण्यात आली . संविधान ग्रुपचे अध्यक्ष राकेश सोनवणे, प्रवीण सोनवणे , हलीमा शेख, सागर जगताप , मुदसर शेख, रोशन शेख, धनाजी, उषा जाधव ,शारदा बनसोडे , रमाबाई लोखंडे ,कविता वाघमारे उपस्थित होते.
त्याच वेळेस शिवाजीनगर चे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची भेट घेवून जाब विचारण्यात आला.आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी अथवा मदत मिळालेली नसून आमच्या खाण्याचे हाल होत आहेत.यावर त्वरित तुम्हाला मदतीची व्यवस्था करतो अशी ग्वाही डॉ.दिवसे यांनी दिली.
दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पुण्यामध्येच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, पाटील इस्टेट येथील कामगार कष्टकऱ्यांच्या वसाहतीमधे कोणतेही पूर्व सूचना न देता पाणी सोडल्यामुळे येथून येथील संपूर्ण वसाहतच पाण्याच्या प्रवाह खाली आली त्यामुळे येथील सर्वच लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे त्यांच्या घरातील अन्नधान्याच्या वस्तू व दररोजच्या वापरण्याचे जीवनाश्यक सामान तसेच मुलांचे शाळेचे वह्या पुस्तके आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड इत्यादींसारखे महत्त्वाचे कागदपत्र ही त्या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636