पिंपरी चिंचवड : एलपीजी सिलिंडर मधून गळती झाल्याने झालेल्या स्फोटात पाच जण जखमी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी मोठा अपघात झाला. येथे पहाटे एलपीजी सिलिंडरमधून गळती झाल्याने झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथील एका खोलीत पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या खोलीत पीडित महिला राहत होत्या. त्यांनी सांगितले की, “घरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गॅसची शेगडी पेटवली आणि त्याचवेळी स्फोट झाला. रात्रीच्या वेळी गॅस गळती झाली असावी, त्यामुळे गॅसची शेगडी पेटवताना स्फोट झाला असावा असा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. .” पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636