मोरेवाडी परिसरात असलेल्या गावठी दारु भट्टयावर पोलिसांची कारवाई.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे
राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोरेवाडी कंजारभाट वसाहत येथे अवैध गावठी दारु भट्ट्यावर राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने कारवाई केली. या कारवाईतून ५४ हजार १०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी प्रकाश जॅकसन बागडे, रोहित प्रकाश माटुंगे, चरण बिरसिंग बागडे सर्व रा. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी, ता. करवीर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी येथे अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्याने राजारामपुरी पोलीसांना मिळाली.
यावेळी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे तसेच कर्मचारयांनी वैध गावठी हातभट्टी दारु निर्मिती करणारयांवर कारवाई केली. तसेच हातभट्टीचे निर्मितीचे सर्व साहित्य समुळ नष्ट करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636