दोन गावटी दारुच्या हातभट्ट्यावर पोलिसांचा छापा , दोघांच्यावर गुन्हा दाखल.
स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाची कारवाई.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे
कोल्हापूर- हातकंणगले तालुक्यातील माणगाववाडी परिसरातील यल्लमकुडी माळभाग येथे पहाटेच्या सुमारास गावटी हातभट्टीची दारु तयार होत असल्याची स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाला माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दि.10/07/2024 रोजी पहाटेच्या सुमारास यल्लमकुडी माळभागात दोन ठिकाणी छापा टाकून तयार होत असलेल्या गावटी दारुच्या हातभट्ट्या जागीच नष्ट करून दारु तयार करण्यासाठी लागणारे 600 /लि.कच्चे रसायन,पक्के रसायन 400/लि.आणि तयार गावटी दारु 180/लि.याच्यासह ज्युपीटर मोपेड व इतर साहित्य असा 96 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून या पैकी प्रोव्ही गुन्ह्याचा माल जागीच नष्ट करून या प्रकरणी आरोपी संजय नरसू बिराने (रा.राजापूर ,ता.शिरोळ जि.को.)आणि मयुर रामचंद्र कांबळे (रा.माने मळा खोतवाडी ,ता.हातकंणगले) या दोघांच्यावर हातकंणगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस राजेश राठोड ,संजय पडवळ,अशोक पवार ,समीर कांबळे,राजू येडगे ,रोहित मर्दाने आणि म.पोलिस सारिका मोटे यांनी केली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636