प्रेस मीडिया लाईव्ह लोकांना न्याय देण्यासाठी सदैव तयार… कुलपती डॉ. पी ए . इनामदार
पुणे.. महाराष्ट्रातील आघाडीची वृतसंस्था प्रेस लाईव्हच्या २०२४ वर्षाच्या दिनदर्शिकाचे उदघाटन मुस्लिम समाजा मध्ये शिक्षणाची क्रांती करणारे कुलपती डॉ. पी ऐ.इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले .
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की खरी पत्रकारिता प्रेस मीडिया लाईव्ह करते आणि जनतेचे प्रश्न उचलून जनतेला न्याय देण्याची ठाम भूमिका घेत असते अशा प्रेस मीडिया लाईव्ह च्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू असे डॉ.पी ऐ. इनामदार यांनी सांगितले.
प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक महेबुब सर्जेखान यांच्या अध्यक्षतेखाली दिनदर्शिकाचा कार्यक्रम घेण्यात आला.
मा.नगरसेविका सौ. हसीना इनामदार यांनी प्रेस मीडिया लाईव्हचे कौतुक करत प्रेस मीडिया लाईव्ह निर्भिड पत्रकारीता करते असे मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बँकेचे संचालक रिकव्हरी कमिटीचे चेअरमन मोहम्मद गौस बबलूभाई सय्यद यांनी केले.
यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रेस मीडिया लाईव्ह चे राज्य प्रतिनिधी फिरोज मुल्ला (सर), मुस्लिम बँकेचे डायरेक्टर हाजी सईद सय्यदभाई, क्रीडा प्रतिनिधी अली सय्यद (सर), अल अजीम , आदी मान्यवर उपस्थित होते .
कुलपती डॉ पी ए इनामदार यांचा सत्कार…..
कुलपती डॉ पी ए इनामदार व सौ.अबेदा इनामदार यांचा या वेळी सौ. हसीना इनामदार , मोहम्मद गौस ,उर्फ बबलू सय्यद , प्रेस मीडिया लाईव्ह चे संपादक मेहबूब सर्जेखान , हाजी सईद सय्यद , फिरोज मुल्ला सर यांचे हस्ते पुषगुच्च व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636