मुख्याध्यापिका अंजुमआरा कासम बागवान यांचा सेवा पूर्ती समारंभ संपन्न
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : पुणे महानगरपालिका अंतर्गत स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येरवडा पुणे येथे तीस वर्षांच्या अध्यापन सेवेतून सेवानिवृत्त झालेला शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुमआरा कासम बागवान यांचा सेवा पूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला.
Advertisement
या सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षणविभागाच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती आशा उबाळे मॅडम, प्रमुख पाहुणे सहाय्यक शिक्षणाधिकारी श्री.दामोधर उंडे,आए.टी.आर अधिकारी व रफी अहमद किडवाई उर्दू माध्य व अमिनोदिन पेनवाले उच्च माध्य विद्यालयाचे प्रभारी मुख्य अध्यापक श्री.रईस शेख,प्रमुख अतिथी सौ.अश्विनी लांडगे,निवृत्त प्राचार्य मोकाशी सर ,सय्यद सर,जमादार सर, पुना काॅलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य फारुकी सर,सौ समिना पटेल ,सौ जाहिदा अत्तार , सौ सय्यद नसरीन , येरवडा पालक संघा च्या अध्यक्षा सौ जुलेखा युसूफ,येरवडा हलका कोअर कमिटी सदस्य एजाझ खान, जी माजी विद्यार्थी, पुणे म न पा च्या मराठी व उर्दू शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निरोप समारंभाचा कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अरब शबाना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सय्यद शकील , निकहत जबीन ,कुमठे रुही,सगरी खालिद ,फौजिया आरिफ,हिना कौसर, बलीराम बडे,गोपनार श्रीकांत, सायमा मिस,सोफिया मिस,रिझवाना मिस,सुमैया मिस, निदा मिस,आयशा मिस,फातिमा मिस, दाऊद सर , सौ.केलकर मृणाल , शिपाई मांडगे बापू यांनी अथक परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636