महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून काल गोष्ट प्रा.डॉ. एन.डी.पाटील यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल.
प्रेस मीडिया लाईव्ह :
Prof.Dr., who contributed invaluable in the construction of Maharashtra and was a moral fear and a constraint in the politics and social affairs of Maharashtra.
ND Patil has to be mentioned respectfully.
इचलकरंजी ता.१५ ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून काल गोष्ट प्रा.डॉ. एन.डी.पाटील यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल.सर्वांगिण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणारे महान कृतीशील प्रज्ञावंत व्यक्तिमत्व म्हणजे एन.डी .पाटील. छत्रपती शिवाजी महाराज ते कर्मवीरअण्णा ,कार्ल मार्क्स ते गाडगेबाबा, महात्मा फुले ते डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी ते महर्षी शिंदे अशा सर्व महामानवांच्या विचारांचा लसावी काढत एन. डी. पाटील समर्थपणे वाटचाल करीत राहिले. त्यातून रंजलेल्या गांजलेल्यांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यासारखा प्रबोधकांचा प्रबोधक महाराष्ट्राच्या विचार परंपरेत दुर्मिळ आहे. अशा या थोर विचारवंत नेत्या कडून प्रेरणा घेऊन आपण वाटचाल केली तर आपला व्यक्तिगत आणि सामाजिक भवताल समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेमध्ये कालवश आचार्य शांताराम गरुड, शहीद गोविंद पानसरे आणि इतर मान्यवरांच्या बरोबरीने एन.डी. पाटील यांचा मोलाचा सहभाग होता. प्रा. डॉ. एन.डी.पाटील समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि अखेरची अकरा वर्षे अध्यक्ष होते.
त्यांची पोकळी भरून काढणे अशक्य आहे.म्हणूनच त्यांचे विचारकार्य सामूहिकपणे नेटाने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी सर्व समतावादी कार्यकर्त्यांनी प्रबोधनाच्या चळवळीशी आपली सक्रिय बांधिलकी जपण्याची गरज आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या ९५ व्या जन्मदिनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहताना बोलत होते. प्रारंभी प्रकाश सुलतानपुरे यांच्या हस्ते प्रा. एन. डी.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी, शिवाजी कदम, गणेश लाड ,विठ्ठल कांबळे, अशोक रवंदे, विशाल भंडारे, नंदा हालभावी, सारिका आरेकर आदींची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636