लोणावळा शहरात मोहम्मद पैगंबर जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
फकीर मोहम्मद इब्राहिम बागवान :
लोणावळा शहरात मोहम्मद पैगंबर जयंती शुक्रवारी (20 सप्टेंबर) मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोणावळा सोशल फाउंडेशन च्या वतीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचा सन्मान व स्वागत करण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.आमदार सुनील शेळके व जनाब झीशान हनीफ शेख यांच्या हस्ते मुलांना भेट वस्तू वाटप करण्यात आल्या.
Advertisement
यावेळी झीशान शेख व फरहान शेख, लोणावळा सोशल फाउंडेशन चे लतीफ खान, अलीम फाझल शेख, अनिस इक्बाल तांबोळी, जाहिद सय्यद, वासिम शेख, परवेझ शेख, इम्रान तांबोळी, नवाझ बागवान, मोहसीन अत्तार, मन्सूर मणियार, अदनान शेख, सुरज मुजावर आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636