अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ बेडकिहाळ येथे त्यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध
जाहिरात
पुणे न्यूज एक्सप्रेस :
बेडकिहाळ : गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ बेडकिहाळ येथे दि-२७ रोजी आंबेडकर चौकातुन भव्य अशी हजारोंच्या संख्येने बौद्ध समाजातील सर्व नागरिक व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ या निषेध रॅलीमध्ये सहभागी होवुन अमित शहा यांच्या विरोधात घोषणा बाजी देत राजीनामाची मागणी करत होते.
ही रॅली आंबेडकर चौकातुन मेन बाजार पेठ मधुन बस स्थानक पासुन आंबेडकर पुतळ्याला हार घालून बेडकिहाळ सर्कल पर्यंत ठिय्या आंदोलन करुन काही वेळेसाठी सर्व वाहतुक थांबवुन ग्रहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा धिक्कार घोषणा देत होते. निपाणी चे डेपोटी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अनेकांचे अमित शहा विरोधी भाषण करन्यात आली.
गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे आजकाल फॅशन झाली आहे. असे वक्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा अपमान केला आहे. या वक्तव्याचा जाहीर निषेध करून अमित शहा यानी देशातील जनतेची माफी मागावी. व गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. गृहमंत्री नाम. अमित शहा यांच्या वक्तव्याचा संपूर्ण देशभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. संसदेबाहेर तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यातील सभागृहामध्ये या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानावर गौरवार्थ चर्चा सुरू असतांना देशाचे गृहमंत्री नाम. अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करीत आंबेडकर यांचे नाव घेणे ही फॅशन झाली आहे. असे अवमानजनक वक्तव्य करून भारतीय संविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे.
डॉ. बाबासाहेच आंबेडकर हे मानवतेचे पुजारी होते. त्यांनी या देशातील जनतेला राज्यघटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिला. हजारो वर्षे माणूसकी हिन जीवन जगणाच्या कोट्यावधी जनतेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, तसेच जगातील सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना देवून देशात संसदीय लोकशाही पध्दत राबवून देश एकसंघपणे ठेवण्याचे महान कार्य केले आहे. अशा महामानवांच्या प्रती प्रत्येक भारतीयांनी नतमस्तक झाले पाहिजे.
परंतू देशाचे गृहमंत्री नाम. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलतांना आंबेडकर आंबेडकर आंबेडकर असे नाव घेणे ही आजकाल फॅशन झाली आहे. जर इतका वेळा देवाचा जप केला तर स्वर्गात सातजन्म जागा मिळेल. असे वक्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. हे वक्तव्य निंदणीय व निषेधार्थ आहे.
अमित शहा यांची ग्रुहमंत्री पदावरुन हकालपट्टी करा. अशी मागणीचे पत्र डेप्युटी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी बेडकिहाळ ग्राम पंचायत चेअरमन शिवानंद बिजले, पी.डी.ओ प्रकाश धनगर, तलाठी संजय नेम्मन्नवर, तसेच ग्राम पंचायत सदस्य सचिन पाटील, प्रमोद पाटील, संजय पाटील, पटेल सर, तात्यासाहेब केस्ते, प्रा.डी एन दाभाडे, जीवन यादव, पिंंटु जाधव, संपत बोरगल,भारत माळगे, गंगाधर सुर्यवंशी, स्वाती कांबळे, महादेवी यादव,दिपा जाधव, डॉ विक्रम शिंगाडे जयश्री जाधव, महमंद मुल्ला तसेच बौद्ध समाजातील महिला आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व लहान मोठे व्यापारी आपले दुकाने सकाळी ७ ते ३ पर्यंत आपला व्यापार बंद ठेऊन सहभागी होते. सदलगा पोलिस स्टेशनचे पी एस आय.पी.एस.आय. बिरादार यांनी सर्व पोलीसासह चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636