नागरिकत्व सुधारणा कायद्याचा ( CAA) पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने तर्फे निषेध


पुणे न्यूज एक्सप्रेस

इचलकरंजी : मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना जाणीवपूर्वक मतांचे राजकारण करत धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठीच CAA हा कायदा लागू केला आह या निर्णयाचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने तर्फे इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालया समोर जाहीर निषेध करण्यात आला.

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तौफिक किल्लेदार कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे यांनी प्रातांधिकारी कार्यालयातील शिरेस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले
भारतीय संविधानाने नागरिकत्वाची जी आचारसंहिता लागू केली आहे या मध्ये व्यक्तीसाठी आहे ती कोणत्याही जातीला किंवा धर्माला नाही. मग भाजपा चे हे सरकार जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मीय वगळून बाकी सर्व धर्मियांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणं म्हणजे संविधानाला च लाथाडल्यासारखे आहे.

Advertisement

धर्मनिरपेक्ष लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे तोच उद्ध्वस्त करून मनुस्मुर्ती लादण्याचे षडयंत्र मोदी ,शहा आणि भाजपा सरकार करत आहे. हिंदुराष्ट्र च्या नावाखाली या देशातील मुस्लिम धर्मीय वगळून अल्पसंख्याक समाजातील भावा बहिणीना अन्यायकारी या कायद्याचा आम्ही निषेध करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे ही विरोध करून हा अन्यायी संविधान विरोधी कायदा मागे घ्यावा असे आवाहन करत आहोत.जर का जबरदस्तीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे . निवेदना वर कुमार कांबळे ( रेंदाळ ) राजू पेंढारी (रुकडी ) सलिम सनदी आदिच्या सहया आहेत


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page