पुणे येथे वार्ताकंनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण प्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने निषेध .
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर – पुणे येथे दै.पुढ़ारीच्या पत्रकारांना पुणे पोलिसांनी त्यांच्या साहित्याचे मोडतोड करून अरेरावी करून मारहाण केल्या प्रकरणी आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने निषेध करून दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.
या वेळी काही पत्रकारांसह पदाधिकारी यांनी आपली मनोगत व्यक्त करुन दोषीवर कडक कारवाईची मागणी करत निषेध केला.या वेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी मारहाण प्रकरणी निषेध करून दोषी असलेल्यांना बंडतर्फ करून त्याची चौकशी करुन पत्रकार संरक्षण कायदाद्वारे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत भविष्यात पत्रकारांच्यावर परत अशा प्रकारे अन्याय होणार नाही.तसेच या संर्भात 29 तारखेला कोल्हापुरात येणारयां उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करुन निवेदन देणार असल्याचे सांगून दसरा चौकात निदर्शने ही करण्यात आली आहे.
या वेळी माजी नगरसेवक इश्वर परमार यांनीही पाठीबा देऊन सहभागी झाले होते.यावेळी कोल्हापुर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे ,उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,कार्याध्यक्ष दिलीप भिसे आणि प्रेस क्लबचे सर्व सदस्य यांच्यासह पत्रकार,छायाचित्रकार उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636