संगीतकार अजय-अतुल यांच्याविरोधात निदर्शने


अजय-अतुल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा एड.राधिका कुलकर्णी यांचा आरोप

पुणे न्यूज एक्सप्रेस :

पुणे : बालेवाडी येथे मागे झालेल्या एका इव्हेन्टमध्ये संगीतकार अजय-अतुल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करून एड.राधिका कुलकर्णी या आयोजक महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या विरोधात काळे झेंडे घेऊन रविवारी सायंकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर निदर्शने केली.तसेच घोषणाबाजी केली.त्यानंतर एड.कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना अजय-अतुल यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला.

अण्णाभाऊ साठे सभागृहात फिरोदिया करंडक पारितोषिक वितरण कार्यक्रमास अजय-अतुल हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याचे समजताच कुलकर्णी यांनी निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती.या प्रकरणी संगीतकार अजय-अतुल यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

काय आहे फसवणुकीचा आरोप ?

एड. राधिका कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागीदार असलेल्या गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने सन २०२७ साली संगीतकार अजय -अतुल यांची बालेवाडी स्टेडियम येथे कॉन्सर्ट आयोजित केली होती. या कॉन्सर्टसाठी अजय -अतुल यांना मानधन द्यायचे ठरले आणि देण्यात आले. ईमेलवर कबूल केल्याप्रमाणे ठरलेले नामवंत कलाकार त्यांनी या कार्यक्रमात सहभागी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ठरलेले मोठे कलाकार आले नाहीत. त्यामुळे तिकीट विक्रीच्या माध्यमातून गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला अपेक्षित रक्कम जमा करणे शक्य झाले नाही. गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीला काही कोटी रुपयांचा फटका बसला. अनेक गुंतवणूकदार यामुळे हवालदिल झाले .

Advertisement

' गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने त्यांचे कोट्यवधी रुपये वसूल व्हावेत व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत याकरिता कलर्स मराठी चॅनलला संबंधित लाईव्ह कॉन्सर्ट प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला.संगीतकार अजय-अतुल यांनी या इव्हेंटचे आयोजक स्वतःच असल्याचे सांगून कलर्स मराठीला प्रसारणाचे हक्क विकले.त्यातून मोठी कमाई केली.अशा तऱ्हेने त्यांनी गायक म्हणून मानधन घेतले,ठरलेले कलाकार तर नाही आणले,पुढे स्वतःच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठीला हक्क विकले. फसवणूक करत संगीतकार गायक अजय अतुल जोडीने ही रक्कम हडप केली.पाठपुरावा करणाऱ्या आयोजकांना प्रतिसाद दिला नाही.',असा आरोप एड.कुलकर्णी यांनी निदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केला.

मात्र,अजय अतुल यांनी संबंधित कॉन्सर्टचे आयोजक आपण स्वतः असल्याचे भासवून परस्पर कलर्स मराठीकडून पैसे गैरमार्गाने स्वतःच्या नावावर घेतले आहेत. तर दुसरीकडे कॉन्सर्टसाठी आलेल्या विदेशी ऑर्केस्ट्रा बँड पथकाला देखील गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंटने वेगळी रक्कम दिलीय. यामुळे गोल्डन एंटरटेनमेंट कंपनीला सर्व बाजुंनी कोटयवधी रुपयांचा फटका बसला आहे.एक रुपया देखील नफा मिळालेला नाही. यामुळे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीचे संचालक संपूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत.

‘एकीकडे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीकडून कॉन्सर्टसाठी पैसे वसूल करायचे तर दुसरीकडे कलर्स मराठी चॅनलला आपणच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठी कडून कईक कोटी रुपये उकळायचे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत व मनी लॉन्ड्रीग देखील झालेली आहे, त्यामुळे अजय अतुल यांच्या गैरमार्गाने कमविलेल्या रुपयांच्या संपत्तीची व रकमेची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी’,अशी मागणी एड.कुलकर्णी यांनी केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या,'या प्रकरणामध्ये फक्त हे अजय-अतुल दोषी नाहीत तर कलर मराठी चॅनल सुद्धा तेवढेच दोषी आहे. ते सामान्य लोकांनी तिकीट काढून येऊन कार्यक्रम बघितलेल्याचे व्हिडिओ आणि कलर्स मराठी चैनलने आयोजकांचे नाव एडिट करून प्रसारित करीत आहेत.आयोजकांचे नाव आणि लोगो कलर्स मराठी चॅनल कसं काढून टाकू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे व्हिडिओ आहेत.कलर्स मराठी ने २०१७ ची कॉन्सर्ट ही २०२२ मध्ये झालेली असे दाखवून सर्व रसिकांची फसवणूक केलेली आहे.कलर्स मराठी विरोधात यापूर्वीच एड.कुलकर्णी आणि त्यांच्या भागीदारानी उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे'.


for more information :advocate radhika kulkarni- 9657660099


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page