आपचा मातंग समाजाच्या मागणीला जाहीर पाठिंबा
पुणे :
आम आदमी पार्टी तर्फे मातंग समाजाच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यात आला. लहुजी क्रांती सेना या संघटनेची पुणे ते नागपूर ही पदयात्रा विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे. आज आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने विष्णू कसबे यांची भेट घेतली. त्यावेळेस आपचे सामाजिक न्याय विभाग आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे बोलताना म्हणाले, मातंग समाज सुधारला पाहिजे त्यामुळे हा समाज सुधारण्यासाठी मातंग समाजाने केलेल्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. तसेच युवकांना आणि समाजातील घटकांना प्रेरणा मिळण्यासाठी लहुजी वस्ताद यांच्या संगमवाडी समाधी स्थळी लवकरात लवकर त्यांचे स्मारक व्हावे.
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातंग समाजातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्यांना पाठिंबा असल्याचे निवेदन देऊन केले. सदर निवेदन देताना आम आदमी पक्षातर्फे महासचिव अक्षय शिंदे, सचिव अमोल मोरे,उपाध्यक्ष शेखर ढगे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636