प्रबोधन ज्योती च्या ३५ व्या वर्षातील पहिल्या अंकाचे प्रकाशन
पुणे न्यूज एक्सप्रेस
इचलकरंजी ता.१४ समाजवादी प्रबोधोनीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाने गेल्या चौतीस वर्षांमध्ये ४३४अंकांच्या माध्यमातून सत्तावीस हजारावर छापील पृष्ठांची सकस वैचारिक शिदोरी दिलेली आहे. दरमहा नियमीतपणे प्रकाशित होणारे आणि राजकीय, आर्थिक ,सामाजिक ,सांस्कृतिक ,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा सर्व विषयांवर भाष्य करणारे महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील एक मौलिक मासिक म्हणून या मासिकाने लौकिक प्राप्त केला आहे. हे मासिक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी ,सजग नागरिक,प्राध्यापक ,अभ्यासक अशा सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे. या मासिकावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी मुंबई विद्यापीठ ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या पी एचडी ,एमफिल आदी पदव्याही प्राप्त केलेले आहेत.
या मासिकाचा आगामी अंक समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ विचारवंत ” प्रा. डॉ.एन. डी.पाटील स्मृतीअंक ” असेल. तो १५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित केला जाणार आहे असे मत प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या’ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाच्या ३५ व्या वर्षातील पहिल्या अर्थात जानेवारी २०२४ च्या अंकाच्या प्रकाशन करतांना बोलत होते.या अंकाचे प्रकाशन शशांक बावचकर, राहूल खंजिरे, अशोक केसरकर, तुकाराम अपराध , पांडूरंग पिसे, देवदत्त कुंभार, शहाजी धस्ते , मनोहर जोशी, अशोक मगदूम आदींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, प्रबोधनाची ज्योत सातत्याने प्रकाशित ठेवण्याचे काम करत या मासिकाने आपले नाव सार्थ केले आहे. या मासिकाने आपला लौकिक चढत्या भाजणीचा ठेवलेला आहे. समाजातील सर्व स्तरांतील जिज्ञासुंमध्ये या मासिका बद्दलची आस्था व विश्वासार्हता वाढत आहे. काही विद्यापीठातील काही ज्ञान शाखानी या मासिकाच्या समावेश संशोधन नियतकालिक या गटात केला आहे. तसेच शेकडो प्रबंधात ,ग्रंथात, लेखात, संदर्भसूचित या मासिकाचा आदराने उल्लेख केला गेला आहे व जातो आहे.जे अद्याप या मासिकाचे वाचक नसतील अशा जिज्ञासू वाचक ,सार्वजनिक ग्रंथालये,महाविद्यालये , स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व मार्गदर्शन केंद्रे आदींनी या मासिकाचे वर्गणीदार वाचक व्हावे असे आवाहन केले.
यावेळी ‘ बिल्कीस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘ या विषयावर सविस्तर चर्चा झाली.तसेचइचलकरंजीचे अधिपती श्रीमंत यशवंतराव गोविंदराव घोरपडे (जहागीरदार )यांच्या मातोश्री श्रीमंत पद्मावती गोविंदराव घोरपडे, शास्त्रीय संगीतातील मातब्बर उस्ताद राशीद खान आणि डॉ. प्रभा अत्रे यांना आदरांजली वाहण्यात आली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636