विद्याचे माहेरघर पुण्यामध्ये पब,पार्टी,ड्रग्स,रोडएक्सीडेंट, कोयतागॅंगचा मोरक्या फडणवीसच.—— राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


पुणे न्यूज एक्सप्रेस :

राज्यातील व देशातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये राज्यातील देशातील व जगभरातील मुले शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये येतात ही मुले फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच व शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवण्यासाठीच पुण्यामध्ये येतात. या अशा शांततामय असणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही वर्षापासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस काही चुकीच्या घटनां घडवण्यासाठी तरबेज झालेले दिसतात.

शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येणारी सर्वसाधारण मुले हे नोकरदार, उद्योगपती,श्रीमंत,उच्चभ्रू घराण्यातली मुले शिक्षण घेण्यासाठी येतात हे हेरूनच नोटाबंदी काळात केंद्र व राज्य सरकारने कमवलेला पैसा आता संपलेला आहे व या अति श्रीमंत मुला मुलीकडे व त्यांच्याकडे असणारा पैसा मिळवण्यासाठी अमली पदार्थाचे व्यसनअमली पदार्थाचा उद्योग करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या आशीर्वादाने अमली पदार्थाचा व्यवसाय करू पाहणाऱ्या लोकांसाठी एक नवे दालन पुण्यामध्ये राज्य सरकारने गृहमंत्र्यांचे आशीर्वादाने चालू केलेले दिसत आहे.

यातूनच पुण्याच्या रहिवाशांची मानसिकता बदलायची व पुण्याच्या पालकमंत्र्याचे खच्चीकरण करण्यासाठी शांततामय असलेल्या पुण्याला अमली पदार्थ सेवन करणाऱ्या शहराचे व शांततामय पुणे शहराचे दहशतवादी शहर करण्याची सुपारीच गृहमंत्र्यांनी आपल्या खात्यामार्फत घेऊन नवीन अमली पदार्थाचा उद्योग सुरू केला आहे असे वारंवार पुण्यामध्ये घडणाऱ्या घटनावरून दिसून येत आहे. मी नाही त्यातली कडी लाव आतली या म्हणीप्रमाणे साजूक पणाचे आव आणणारे व अगदी कोणाचा कोणाला पत्ता लागू न देता शांत डोक्याने सायलेंट किलर पद्धतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये हिंसक घटनां घडवण्यामध्ये तरबेज झालेले दिसून येत आहे.

Advertisement

पुण्यामधील ससून रुग्णालयात झालेला ड्रग्ज प्रकार,सुसून रुग्णालयांमध्ये गुन्हेगारी पेशंट कडून करून घेतलेल्या ड्रग्स कारवाया,पोलीस व्हॅन मधून पोलिसाच्या मार्फतच करत असलेले ड्रग्स वाहतूक, पुण्यामध्ये पोलिसांकडूनच पब, पार्टी, डान्सबार, अमलीपदार्थ यांना परवानगी देऊन रात्रभर पब व हॉटेल ना पुण्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये पुण्याच्या संस्कृतीची वाट लावून शिक्षण घेणाऱ्या मुलांना चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने चालू आहे असे दिसत आहे यावरून गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्याची ओळखी ड्रग्ज तस्करी व कोयतागॅंगची करण्याची सुपारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे असे एकंदरीत दिसत आहे त्यामुळे पुण्यात होणारे रोड एक्सीडेंट त्यात मारण्यात येणारे निष्पाप जीव, रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या त्यात होणारे ड्रग्ज प्रकार, भर दिवसा होणारी कोयतागॅंगची दहशत त्यातून होणारे खून, मारामारी व सामान्य नागरिकांना शांत वाटणारे पुणे भयभीत वाटत आहे हे केवळ आणि केवळ पोलिसांचा वचक नसल्यामुळे हे सगळे प्रकार गृहमंत्र्याच्या आदेशा वरूनच स्थानिक पोलीस करत आहे अशी एकंदरीत दिसत आहे.अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page