पुणे : झिका विषाणूची 6 प्रकरणे नोंदवली गेली
संक्रमितां मध्ये 2 गर्भवती महिलांचाही समावेश आहे
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुण्यात झिका व्हायरसचे सहा रुग्ण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सहा रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील २८ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी 12 आठवड्यांची गर्भवती महिला संक्रमित आढळली आहे. सध्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636