पुण्यातील ‘वार्शिप अर्थ फाऊंडेशन’ या संस्थेला उत्कृष्ट लोकशाही मित्र (निवडणूक साक्षरता मंडळ) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे न्यूज एक्सप्रेस
पुणे : निवडणूक साक्षरता विषयासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल पुण्यातील ‘वार्शिप अर्थ फाऊंडेशन’ या संस्थेला उत्कृष्ट लोकशाही मित्र (निवडणूक साक्षरता मंडळ) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निवडणूक साक्षरता मंडळाच्या स्थापनेसंदर्भात निवडणूक आयोगाने वर्शिप अर्थ फाऊंडेशनवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. राज्यामध्ये सन 2023-24 या वर्षभराच्या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमामुळे आणि नवमतदार नोंदणी 2 लाखांहून अधिक (18-19 वर्ष वयाचे नवमतदार) नोंदणी आणि 450 शाळा महाविद्यालयांशी केलेल्या करार आणि निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन केल्यामुळे वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, तेजस गुजराथी यांना उत्कृष्ट लोकशाही मित्र (निवडणूक साक्षरता मंडळ) हा पुरस्कार देण्यात आला.
यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सहा महाविद्यालये, पाच प्राध्यापक आणि पाच युवा कॉलेज अॅम्बॅसॅडर यांची निवड झाली आणि यांना सन्मानपूर्वक मुंबई येथे दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636