मालमत्ता करामध्ये ४०% सूट देण्यात पुणे महानगरपालिकेची टाळाटाळ
पुणे : राज्य शासनाकडून 40% सूट चालू ठेवण्याबाबत चा निर्णय झाल्यानंतर , महानगर पालिकेने नागरिकांना ते स्वतः राहत असलेल्या मालमत्ते साठीच्या मालमत्ता करामधे 40% सूट मिळण्यासाठी PT-3 अर्ज करण्यास सांगितले होते. खरे तर ही सूट सरसकट सर्व मालमत्ता धारकांना देणे अपेक्षित होते पण यात अनेक अटी आणि कागदपत्र मागण्यात आले. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आणि लोकांना कागदपत्र मिळवण्यास वेळ गेला.
आता देखील महानगर पालिकेचे कर्मचारी दिवाळी सुट्टीचे कारण सांगून अर्ज जमा करण्यास घाई करत आहेत आणि वेग वेगळी करणे सांगून लोकांचे अर्ज घेत नाहीत. तुम्ही जास्त मोठी मालमत्ता वापरत आहात किंवा एका पेक्षा जास्त मालमत्ता वापरत आहात असे दाखवले तर तुमची मिळालेली सवलत जाईल अशी शंका उपस्थित करत आहेत. कोरोना आणि त्यानंतर महागाई मुळे सर्व लोक त्रस्त आहेत त्यामुळे जो अर्ज करेल त्याला सरसकट सूट देणे अपेक्षित आहे. महानगर पालिकेने त्यात जास्त नियम लावू नये ही नागरिकांची मागणी आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2023 असे सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यात दिवाळीची सुट्टी असल्या कारणाने लोक अर्ज देऊ शकत नाहीत. कोणताही नागरिक सूट मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून पुणेकरांना PT-3 अर्ज देण्यासाठी वाढीव वेळ देण्यात यावा असे निवेदन आज दि. 09 नोव्हेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने पुणे शहर आयुक्तांना देण्यात आले.
पुणे महानगर पालिका आयुक्त यांनी लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन याबाबत नोटीस काढावी म्हणजे लोकांची शेवटच्या वेळी धावपळ होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली.
निवेदन देते वेळी अक्षय शिंदे, महासचिव आम आदमी पार्टी पुणे शहर, सचिन कोतवाल, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी, पुणे शहर, रवि लाटे, प्रशांत कांबळे, शंकर थोरात, संजय कटारनवरे, विकास लोंढे आणि इतर अनेक आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636