पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उद्या पुणे येथे संपन्न होणार
पुणे येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे 09 डिसेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या वेळी एकूण 65 मान्यवरांची पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे , या मध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे .
या समारंभाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व. मुस्लिम को ऑप बँकेचे ज्येष्ट संचालक मा. अय्युब शेख असणार आहेत, प्रमुख पाहुणे मुस्लिम को ऑप बँकेचे संचालक व रिकव्हरी कमिटीची चेअरमन मा. मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. इकबाल अंसारी . प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. तुषार निखळजे लेखक, साहित्यिक (पुणे ) , मा. फिरोज मुल्ला सर पत्रकार , समाजसेवक मा. खंडू इंगळे कार्यकारी संपादक दैनिक कर्मयोगी कराड, मा. औरंगाबाद युवा चे संपादक मा. अब्दुल कय्युम अब्दुल रशीद औरंगाबाद ,मा. सौ . प्रमोदीनी मारुती माने असणार आहेत , या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अयुब शेख माजी नगरसेवक व ज्येष्ठ संचालक मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम बँक चेअरमन रिकवरी कमिटी पुणे यांनी केले आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636