बांधकाम व्यावसायिकांना रविराज काळे यांचा दुसरा दणका
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पिंपरी प्रतिनिधी : पिंपळे निलख येथिल सर्वे नं 62P हिस्सा नं 1+2 Shavira डेव्हलपर्स एल. एल.पी. या बांधकाम व्यावसायिकाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाची कसल्याही प्रकारची परवानगी न घेता महानगरपालिकेच्या डकमध्ये अतिक्रमण करून 60 मी विद्युत केबल टाकण्यात आली होती.
Advertisement
आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी आज शहर अभियंता मकरंद निकम यांना तक्रार करताच ड प्रभागातील स्थापत्य विभागाचे सर्व अधिकारी येऊन प्रकरणाची माहिती घेतली आणि अनधिकृत पणे टाकलेली विद्युत केबल जप्त केली . केबल जप्त करून भागणार नाही तर संबंधित बांधकाम व्यावसायिकावर मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी नुसार गुन्हा देखिल दाखल करण्यात यावा अशी मागणी रविराज काळे यांनी केले.
एवढ्या तातडीने कारवाई केल्याबद्दल शहर अभियंता मकरंद निकम यांचे फोनद्वारे आभार देखिल मानले.एक महिन्यापुर्वी गेरा बांधकाम व्यावसायिक यांचेकडून देखिल 7 कोटींची रक्कम दंड म्हणून वसूल केली होती . तेव्हा देखिल रविराज काळे यांनी सदर प्रकरणाचा पाठपुरावा केला होता दंड भरण्यास बांधकाम व्यावसायिकास भाग पाडले होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636